Tuesday, July 5, 2016

एमी ब्रिजवॉटर (१९०६ - १९९९)
एमी हि ब्रिटीश चित्रकार. तिचा जन्म बर्मिंगहॅमला झाला. लहानपणीच तिनं चित्रकलेला वाहून घ्यायच ठरवल होत  आणि त्यानुसार तिनं फ्लिंटवूड वॉकर यांच्या हाताखाली रितसर शिक्षणही सुरू केले.

 एमीचे काम समजून घेताना आपल्याला अतिवास्तववादी शैली म्हणजे काय याकडे वळावे लागेल. अतिवास्तववाद हा आपल्या मनाच्या अचेतन अवस्थेत केलेला विचार आहे. सुप्तावस्थेत असताना मनात येणारे कल्पित, अकल्पित विचार, अप्रत्यक्ष अनुभूती या आपल्या मन:पटलावर दृश्यस्वरूपात उमटतात. जसे कि स्वप्न. हे विचार चित्र, साहित्य, चित्रपट यासारख्या माध्यमातून मांडली जाणारी चळवळ एकोणिसाव्या शतकात युरोपमध्ये सुरू झाली. १९३६ मध्ये असेच  एक अतिवास्तववादी  प्रदर्शनातील चित्रे पाहून एमी अतिवास्तववादी चित्रशैलीकडे ओढली गेली. सुरूवातीच्या काळात ती वास्तववादी शैलीत काम करत असली तरी यानंतरचे तिचे सर्व काम हे अतिवास्तववादी (surrealism) शैलीतील राहिले.

एमी हि ब्रिटनमधील महत्वाची अतिवास्तववादी कलाकार ठरली, प्रामुख्याने तिच्या पेंटिंग्ज्मुळे. एमीने कोलाज, कॅनव्हास, पेन अँड इंक यासारख्या वेगवेगळ्या माध्यमात काम केले (एमी कविताही करत असे). एमीच्या मनात उमटणारे विचार, तिच्या स्वप्नात निर्माण होणारे दृश्यानुभव तिने मोजक्याच रंगामध्ये कॅनव्हासवर मांडले. तिची चित्रे बहूतांशी वेदनेचे चित्रण करतात. सुखदु:खासारखी कुठलीच भावना कायम नसते. कॅनव्हासवरच्या लयदार रेषांमधुन प्रकट होणारी पक्षी, पाने, फळे, अंडी यासारखी प्रतिके अनुभवांची क्षणभंगुरता सांगतात. अतिवास्तववादी शैलीत आपल्या मनात उमटणारे विचार कॅनव्हासवर मांडले जातात. अनुभव हे व्यक्तीसापेक्ष असले तरी वेदना, सुख यासारख्या भावना एमीलाही होत्या आणि आपल्यालाही आहेत. त्यामुळे तिने ज्या वेदना कॅनव्हासवर मांडते त्या बारकाईने पाहिल्या की ती वेदना आपल्याशीही एकरूप होते. मग कॅनव्हासवरची प्रतिके, स्वप्नांचे दृश्यरूप आपल्यालाही हलवून सोडते.

एमीच्या प्रभावी कामामुळे ती मोजक्या सहा ब्रिटीश चित्रकारात निवडली गेली ज्यांची चित्रे पॅरिसमधील चित्रप्रदर्शनात मांडली गेली. एमीने युरोप आणि उतर ठिकाणीही एकल आणि सामुहीक चित्र प्रदर्शने केली आणि तिला युरोपिय कलाजगतात मानाचे स्थान मिळाले. इतकी संगळी कलानिर्मिती करत असताना आपली वॄध्द आई आणि बहिणीची काळजी घेण्यासाठी काहीकाळ ब्रेक घेतला. १९७० पासून तिने पुन्हा आपले काम सुरू केले ते कोलाजमध्ये. अतिवास्तववादी शेलीतील चित्रे, कोलाज चित्रे, शाईतील रेखाटने यासारखी विविधांगी कलानिर्मिती करणार्‍या एमीचा वयाच्या  अठ्ठ्याण्णव्या वर्षी मृत्यू झाला. अतिवास्तववादी शैलीचा स्विकार करून त्यामध्ये निर्मिती करणारी एमी हि महत्त्वाची कलाकार होती. आपल्या जवळच्यांची सेवा करताना तिचा बराच काळ निर्मितीविना गेला.  तिच्या मृत्यूमुळे ब्रिटीश कलावर्तुळ आणि अतिवास्तववादी शैलीत काम करणारे कलावर्तुळ यातील महत्वाचा दुवा निखळला याचे वर्णन तिच्याच कवितेत करता येईल.
“No brushes and no colours and no inks running
No fingures and no hand holding
The brush not moving in lines
Staying all so staying so will”
                        -“On the Line” by Emmy Bridgewater

                       

Wednesday, January 9, 2013

Friday, July 1, 2011

my pen n page series for figure study



I decided to work with just pen n sheet of paper and am working on figure study more n more.